Thursday, 2 March 2017

राष्ट्रीय सुरक्षा ???? आणि भारत देशाला कम्युनिस्टांचा धोका.

    भगवान श्रीकृष्ण म्हणालेले कि "जे राष्ट्र सुरक्षित आहे तेच राष्ट्र प्रगती करू शकेल अन्यथा विकास तर थांबेलच सोबत राष्ट्र ही उध्वस्थ होईल " एकंधरीत आज माझ्यामते भारत त्याच मार्गावर आहे ,हे आज पासून न्हवे तर 15 ऑगस्ट 1947 पासून, हो तेव्हापासूनच.. आणी याचं कारण आहे देशामध्ये होत असलेली देशविरोधी करवाई म्हणजेच हे #कम्युनिस्ट आणि काही पाकिस्तान व चीन गुपित संगठना.
      मित्रांनो आपण जर पहिल तर कळेल की जापान जो देश भारतापेक्षा खुप लहान आहे तिथे नुक्लेअर अटैक होऊन ही आज आपल्या पेक्षा अधिक विकसित आहे आणि सुरक्षित ही, पण आपली अवस्था पाहून एक मनात प्रश्न येतो तो म्हणजे What about Bharat? का भारत अजुन विकसित राष्ट्र नाही? का माझ्या या सोनेकी चिड़िया चा विकास होत नाहीये? का गरीब गरीबच राहतोय? का रोजगार मिळत नाहीये लोकांना?? का??? त्याच ही उत्तर एकच आहे ते म्हणजे भारतामधील देशविरोधी (कम्युनिस्ट) चळवळ...
      मुद्यावर जर बोलायच म्हणल तर स्पष्ट सांगू इच्चितो की हे जे लाल सलाम वाले (CPI, CPM, AISA, SFI व इतर यांचे सहकारी) आपल्याला अनेक शहरांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये आढळतात ते खरोखर देशविरोधी आहेत. यांचा मुळ उद्देश आहे भारताचे 18 ते 20 तुकडे करून भारतामध्ये हुकुमशाही आणायची आणि ज्या लाल किल्यावर आज माझा तिरंगा फड़कतोय त्या तिरंग्याच्या जागी या राष्ट्रद्रोह्यांना लाल झेंडा फडक्वायचाय.. होय मित्रांनो हे खरय.
      ज्या दिवशी भारतामध्ये राष्ट्रवादी विचारसरणीची (बीजेपी) सत्ता आली त्या वेळेस या लाल ढेकण्यांना स्वास घेण अवघड झाल आणि 9 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांच्या खरा चेहरा अभाविप ने समोर आणला.. म्हणे कश्मीर मांगे आजादी, केरल मांगे आजादी, बंगाल मांगे आजादी सोबतच न लाजता म्हणे भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्ला इंशाल्लाह, अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है...अरे कोण हा अफझल? हा तोच अफझल ज्याने संसदेवर हल्ला केलता आणि त्याची शिक्षा त्याला आपल्याच भारतातील न्यायालयाने दिली. म्हणजे यांचे म्हणणे आहे की न्यायलय हे अफझल गुरु चे कातिल आणि हा अफझल या लाल ढेकण्यांचा हीरो.म्हणे तुम कितने अफझल मरोगे, हर घर से अफझल निकलेगा..त्या राष्ट्रद्रोह्यांना एकच सांगू इच्चितो अफझल आमच्या शिवबांनीही मारलेला, न्यायालयाने अत्ता मारला आणि भविष्यात आम्ही मारू तेहि घरा घरात शोधून मारू.
      काहीदिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठामधील रामजस महाविद्यालयमध्ये अश्याच देश विरोधी घोषणा देण्यात आल्या. याचा तीव्र विरोध तेथील स्थानिक विद्यार्थी संघ व अभाविप ने केला. मला नाही वाटत अभाविप ने याचात काही चुकीच केल, आणि जर देशविरोधी कार्यांचा विरोध करने ही चूक असेल तर अभाविप ने ही चूक नक्कीच करावी, जनता आपणास समर्थन देईल याची सर्वांना खात्री आहे. काही राजकीय पक्ष अभाविप चा विरोध करून स्वतःची राजकीय पोळी भाजुन घेतायत ती गोष्ट वेगळी कारण जनता त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेन.
      मित्रांनो आज आपल्या देशाची सुरक्षा नाजुक होऊन बसलिये.समजा आपण एखाद्या झाडाला सुरक्षेसाठी जाळी लावली पण झाडाला जर किड लागली आणी आपन त्याच्यावर काही उपायच नाही काढला तर?? झाड़ नष्ट होइन,उध्वस्त होइन संपेल ते झाड़. हाच नियम देशासाठी लागू होतो. आपले सैनीक देशासाठी हुतात्मा होतायत, आपला जीव गमावतायत, अतिरेक्यांना ठोकून काढतायत पण या देशात अनेक शहरांमध्ये व विद्यापीठानमध्ये लपलेली ही कम्युनिस्ट नावाची किड देशाला कुजवतीये. हे नालायक लोक आपल भारत तोड़ू इच्छीतायत आणि काहीे राजकीय नेते त्यांच्याबाजुने उभे राहून त्यांनाच मदत करतायत, का तर त्यांची राजकीय भाकरी या प्रकरणात भाजुन निघती. लाजा वाटल्या पाहिजे या हरामखोर नेत्यांना, विकुन ठेवतील हा राष्ट्र आपला.. एक सरकार त्यांच्या विरोधातल काय आल , चालले देशद्रोह्यांच्या समर्थनाला. अरे मित्रांनो सरकार खुप चांगल काम करत आहे, 60 वर्षात उध्वस्थ झालेल कारभार 5 वर्षात नीट होत नसतं हे आपल्याला चांगलच ठाऊक आहे. 60 वर्षात यांनी हे असले लाल (कम्युनिस्ट) दिवे लावुन ठेवले आणी आज खेदाची गोष्ट अशी की भारतात राहून भारत विरोधी घोषणा ऐकायला मिळत आहेत.
      जर भाजप सरकार केंद्रात आलेच नसते तर?? तर काय हे कम्युनिस्टांचे कृत्य आपल्या समोरच आले नसते.मी काय मोदी भक्त किंवा भाजप समर्थक नाहीये पन या देशाची काळजी आहे मला आणि तुम्हाला ही असावी म्हणून चार शब्द लिहिन्याचा प्रयत्न केला.
       
             *नक्की कोण आहेत हे कम्युनिस्ट?*
      भारतामध्ये कम्युनिस्ट हे राष्ट्रीय भावनांपेक्षा वेगळे न्हवे तर कट्टर विरोधी आहेत म्हणजेच राष्ट्रविरोधी.
      भारत छोड़ो आंदोलन ज्यावेळेस भारतामध्ये झाल त्यावेळेस हे लाल सलामी इंग्रजांच्या सोबत होते.
      नेताजी सुभाष चंद्र बोस यांना "तोजो चा कुत्रा" असे संबोधित करणारे हेच ते कम्युनिस्ट.
      ज्यावेळेस मुस्लीम लीग ने भारताच्या विभाजनाची मागणी केलेली त्यावेळेस त्यांना भक्कम समर्थन देणारे हेच ते कम्युनिस्ट.
      भारत आणि चीन युद्ध मध्ये चीन ची बाजू घेऊन राष्ट्रद्रोह करणारे हेच ते कम्युनिस्ट.
      JNU Delhi मध्ये देश विरोधी घोषणा देणारे हेच ते कम्युनिस्ट.
      कश्मीर ला पाकिस्तान चा भाग संभोदित करणारे हेच ते कम्युनिस्ट.
      Delhi University मधील रामजस महाविद्यालय मध्ये कश्मीर मांगे आझादी, बस्तर मांगे आझादी च्या घोषणा देणारे हेच ते कम्युनिस्ट.
     गुरमेहर कौर या शहीद सैनिक च्या मुलीला रेप ची धमकी देणारे ही हेच ते कम्युनिस्ट.

      केरळ मध्ये दररोज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ला करणारे, त्यांना कापून काढणारे हेच ते लाल विषारी कम्युनिस्ट.

      मित्रांनो मी ही आपल्या सारखाच एक सामान्य नागरिक आणि विद्यार्थी आहे.. मला माझ्या देशाची संस्कृती जपून ठेवायचिये या भारत भूमिला अखंड ठेवायचय अर्थात हे आपल्या सर्वांचे कर्त्तव्य आहे. हे राष्ट्र कम्युनिस्ट मार्क्स किंवा लेनिन चे राष्ट्र नाहीये हे राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज , महाराणा प्रताप यांचे राष्ट्र आहे, गुरु गोबिंदसिंहजींचे, वीर सावरकरांच, भगतसिंह सुखदेव राजगुरु यांच राष्ट्र आहे एपीजे अब्दुल कलाम च राष्ट्र आहे.. हे राष्ट्र त्या सर्वांच आहे ज्यांनी या भारत भू ची अस्मिता उंचावली ज्यांनी आपले प्राण समर्पित केले या भूमीला अखंड ठेवण्यासाठी.
       मित्रांनो प्रयत्न केलाय देशविरोधी कृत्य व देशाला अखंडते पासून दूर करण्याचे षड्यंत्र आपल्या पर्यन्त पोहोचवन्याचा. या लाल ढेकण्यांना (CPI,CPM, AISA,SFI) आपल्यापासून दूर ठेवा. आपल्या महाविद्यालयत पौल ही ठेऊ देऊ नका या देशद्रोह्यांना.

वंदे मातरम.. भारत माता की जय

योगेश्वर राजपुरोहित
9404131857

Monday, 20 February 2017

*वेळ आलिये एक ज्ञानयुगाचा आरंभ करण्याची*


अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चा 3 दिवसीय ज्ञानमंथन हा भारतीय प्राच्यविद्या, तत्वज्ञान आणि इतिहास अभ्यासवर्ग 17 ते 19 फेब्रुवारी रोजी पार पडला.
      आजची देशाची परिस्थिति पाहिली तर असा लक्षात येत कि आज आपण ज्ञानाची वाट चुकलो आहोत, म्हणजेच आपण आपली संस्कृति, इतिहास प्राचीन कला पूर्णपणे विसरून गेलो आहोत .आणि योग्य वाटेवर यायचा रास्ता असेल तर तो आहे पुन्हा मागे जाऊन आपल्याला आपली पूर्व संस्कृती व इतिहासाच्या मार्गाने वाटचाल करावी लागेल.
      ज्ञानमंथन या अभ्यासवर्गाचा हाच उद्देश्य कि वर्तमानाचा पाया हा पूर्व इतिहास असतो आणि हे आपण विसरु नए. वेद, उपनिषद, भगवतगीता, पुराण, स्मृती, दर्शन शास्त्र, संत साहित्य, एकात्म मानव जीवन दर्शन व अनेक प्राचीन कला, विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक ची ओळख करून देणाऱ्या या अभ्यासवर्गाने खरोखरच एक ज्ञानयुगाचा उगम पुण्यातून केला आहे. आपल्या राष्ट्राचे निर्मिती ही प्राच्यविद्या, तत्वज्ञान, इतिहास व अनेक संत महात्मयांच्या ज्ञानातून झाली आहे, कोणत्या युद्धा मुळे नाही असा अभ्यास ज्ञानमंथन कार्यशाळेत झाला.
      खेदाची गोष्ट ही आहे कि खुप कमी विद्यार्थ्यांना व युवा पिढीला आज भारतीय प्राच्यविद्या आणि तत्वज्ञानाची माहिती आहे आणि म्हणूनच एकंधरित या देशाचा विकास रखडलेला आहे. मानव विकासाचे ही तसंच आहे. मनाचं सुख प्राप्त करत आहेत पण बुद्धिच होत नाहीये आणि ज्यांनी बौद्धिक सुख प्राप्त केलय ते आज नक्कीच ज्या त्या क्षेत्रात देशाच नाव मोठ करतायत आणि तेही फक्त भारतीय न्हवे तर विदेशी लोक भारतीय प्रच्याविध्येतुन ऊंच शिखरावर पोहोचलेत. आज जगातल्या प्रत्येक क्षेत्रात श्रीमद् भगवद गीतेचा उपयोग होतोय आणि आपल्या देशात अजुन जाती पातीचे वाद इतिहासांवर टिका होत आहे..जर आपण जागृत झालो नाही तर नक्कीच बाकीचे देश आपल्या प्राच्यविद्येच्या मदतीने आपल्या पुढे जातील याची आपण जाणीव ठेवायला हवी.
      आपण सर्व सुशिक्षित आहोत आणि आपल्याला या देशाची सांस्कृतिक निर्मिती करायची आहे.यह देश हमें देता है सब कुछ हम भी तो कोई देना सीखे हा नारा मनात घेऊन युवा पिढीला सर्व समुदाया मध्ये सांस्कृतिक सभ्यता निर्माण करायची आहे आणि तेव्हाच हे राष्ट्रपुनर्निर्माण होईल आणि आपण सर्व एकत्रीत राहणे शक्य होईल. आणि हो थोड़ा संघर्ष सर्वांनी केला तर नक्की आपन एकत्र राहु शकतो कारन हे सिद्ध झालय कि सर्व भाषा ज्या या पृथ्वी वर बोलल्या जातात ते सर्व संस्कृत मधून निर्माण झालेल्यात आणि म्हणून आज सर्व भाषांवर  एकता आहे.
      आपण जर आपला इतिहास पहिला तर कळेल कि आपला संघर्ष हा जमीन,पाणी, पृथ्वीशी नाहीये.. आपण सर्व एक आहोत पण काही लोकांनी पूर्वी समाजामध्ये विष पेरल्या मुळे आज आपण संगठित नाहीयोत. आपण एकत्र राहू शकतो फक्त आपल्याला ते समाजातील विष काढण्याची गरज आहे. इतिहासात गेलो तर आपल्याला कळेल की माझा देश माझे राष्ट्र हे खरच "सोन्याची चिमणी/ सोनेकी चिड़िया होती. आज वेळ आलिये प्रत्येकाने आपल्या इतिहासाचा अभ्यास करण्याची, राष्ट्राप्रति नात घट्ट करण्याची, देशाला ओळखून घेण्याची आणि जगाला भारताला खरी ओळख करून देण्याची.
      समाजामध्ये अशे अनेक So Called महान व्यक्ति आहेत जे आपल्याला चुकीचे ज्ञान देऊन आपल्या मध्ये फुट निर्माण करतायत सोबतच आपल्या संस्कृती पासून आपल्याला लांब नेहण्याचा प्रयत्न करत आहेत. असच एक उदाहरण म्हणजे "मनुस्मृती", मी लहान पनापासून मनुस्मृती बद्दल खुप चुकीचे ऐकत आलोय परंतु जेव्हा ज्ञानमंथन मध्ये अभ्यास झाला तेव्हा कळाले कि अश्या अनेक गोष्टी मनुस्मृती मध्ये आहेत ज्या समाजाला संगठीत करू शकतात. जसे एका नान्याला दोन बाजु असतात तसेच मनुस्मृतीच आहे, विष अमृत दोन्ही आहे जे हवय ते घेण आपल्यावर आहे. हे तरी एक उदाहरण आहे अशे अनेक उदाहरणे आहेत जे आपल्या राष्ट्राला संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण करून देतात पन दुर्भाग्य अस आहे की मुळात आपलाच अभ्यास नसतो त्या गोष्टीचा त्या इतिहासाचा. पण लोक (विदेशी) मात्र त्याचा अभ्यास करून शिखरावर पोहोचलियेत.
      इतिहास आणि प्राच्यविध्ये सोबतच जर समाजाला योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते भारतातील संतांनी.आपल्या राष्ट्रच्या निर्मिती माघे अनेक संतांची प्रेरणा होती. संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, रामदास स्वामी,संत रोहिदास व अनेक संतांनी या राष्ट्रमध्ये आपले योगदान अनेक माध्यमातून दिले आहे. संतांनी खऱ्या अर्थाने समाजामध्ये समरसता पासरवन्याचा प्रयत्न केला आणि पसरवली ही, सोबतच रामदास स्वामींनी राजनीती तर संत नामदेवांनी राष्ट्रवाद पेरण्याचे काम केले.एकंधरित पहिल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या पाठीमागे महाराष्ट्रातील संतांची प्रेरणा होती. संतांनी नेहमी समाजाला समरस करण्याचा प्रयत्न केला, जेवढे काही समाज सुधारक आले त्यांच्या सर्वांचे मुळ हे संतांकडूनच आले कारण संतांची शिकवण होती ती म्हणजे "समाजाला कर्त्तव्य शिकवतो तो धर्म आणि हे समाजच आहे जे आपल्याला सर्व काही देत आपण ही काहि तरी द्यायला हवे..आणि जो या समाजाची सेवा करेन त्याला नक्की मोक्ष प्राप्त होइन"
        *मित्रांनो आपला इतिहास आपल्याला खुप कही शिकवतो फक्त त्याला जाणन्याची गरज आहे..वेद, उपनिषद, भगवतगीता, पुराण, स्मृती, दर्शन शास्त्र, संत साहित्य, एकात्म मानव जीवन दर्शन व अनेक प्राचीन कला, विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक आपल्याला भरपूर काही शिकवतात पण आपन याला नेहमी टाळतो.एकदा अभ्यास करून पहा जीवनाच कल्याण होईल..*
धन्यवाद

योगेश्वर राजपुरोहित
9404131857

Sunday, 15 January 2017

#JusticeForAbhishek

#JusticeForAbhishek
भारत माता की जय ची घोषणा दिलेली ओ फक्त त्याने, काय चुकल त्याझ? एकीकडे रोहित वेमुला देशद्रोही याकूब चे नारे देत होता, तेव्हा तुम्ही त्याझ्या मयता वर आपली राजकीय पोळी भाजुन घेतली आणि आज जेव्हा एक सामान्य अभाविप विद्यार्थी कार्यकर्ता NSUI व कर्नाटक सरकार (कांग्रेस सरकार) च्या धमक्यांना आणि चुकीच्या FIR ला घाबरून आत्महत्या करतो तेव्हा सगळे चिड़िचुप. कुठे पळून गेले स्वतः ला लोकशाही चा चौथा स्थंभ म्हणून घेणारे ?, कुठे गेल्या बाकी सर्व विद्यार्थी संगठना? कुठे पळाले सगळे पुढारी ? का होत नाहियेत खुल्या चर्चा या विषयावर? उत्तर एकच आहे .. त्याझावर खरा अन्याय झलता आणि त्याला खरच धमकवल गेल होत ज्याचा मुळे त्याला हे जग सोडाव लागल.. म्हणून हे सगळे गप आहेत.
कर्नाटक मधील J.C.B.M College मधे अभाविप ने "योद्धा नमन" या नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्याचा मधे #अभिषेक ही सहभागी होता परंतु या कार्यक्रमाच्या वक्तयांना NSUI चा विरोध होता ज्याचामुळे कॉलेज ने कार्यक्रमाला स्थगित करण्याचा आदेश दिला. काही कारण नसताना Karnataka Congress Govt व NSUI ने राज्यात स्वतःच्या सत्तेच्या जोरावर अभाविप कार्यकर्त्यांवर FIR दाखल केली ज्याला घाबरून #अभिषेक ने मंगळवारी आत्महत्या केली.
काय चुकल होत त्या चिमुकल्याच, तो ही कोणाचा मुलगा, भाऊ , मित्र होता ... त्याझे ही काही स्वप्न होते ज्याला या हरामखोर नीच कांग्रेसिंनी चिरडून टाकले.
त्या रोहिथ वेमुला सारखा याकूब समर्थक विद्यार्थी आत्महत्या करतो तेव्हा याच बुद्धिजीवींच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रु निघतात आणि आज #अभिषेख सारखा होनहार विद्यार्थी जग सोडून जातो तेव्हा हेच बुद्धिजीवी मौन पाळून बसलेत....  लाज वाटती या सर्वांची विशेषतः या ढोंगी मीडिया ची...

देशाचे डोळे कधी उघड़नार , देव जाने..

योगेश्वर राजपुरोहित,
9404131857