अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चा 3 दिवसीय ज्ञानमंथन हा भारतीय प्राच्यविद्या, तत्वज्ञान आणि इतिहास अभ्यासवर्ग 17 ते 19 फेब्रुवारी रोजी पार पडला.
आजची देशाची परिस्थिति पाहिली तर असा लक्षात येत कि आज आपण ज्ञानाची वाट चुकलो आहोत, म्हणजेच आपण आपली संस्कृति, इतिहास प्राचीन कला पूर्णपणे विसरून गेलो आहोत .आणि योग्य वाटेवर यायचा रास्ता असेल तर तो आहे पुन्हा मागे जाऊन आपल्याला आपली पूर्व संस्कृती व इतिहासाच्या मार्गाने वाटचाल करावी लागेल.
ज्ञानमंथन या अभ्यासवर्गाचा हाच उद्देश्य कि वर्तमानाचा पाया हा पूर्व इतिहास असतो आणि हे आपण विसरु नए. वेद, उपनिषद, भगवतगीता, पुराण, स्मृती, दर्शन शास्त्र, संत साहित्य, एकात्म मानव जीवन दर्शन व अनेक प्राचीन कला, विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक ची ओळख करून देणाऱ्या या अभ्यासवर्गाने खरोखरच एक ज्ञानयुगाचा उगम पुण्यातून केला आहे. आपल्या राष्ट्राचे निर्मिती ही प्राच्यविद्या, तत्वज्ञान, इतिहास व अनेक संत महात्मयांच्या ज्ञानातून झाली आहे, कोणत्या युद्धा मुळे नाही असा अभ्यास ज्ञानमंथन कार्यशाळेत झाला.
खेदाची गोष्ट ही आहे कि खुप कमी विद्यार्थ्यांना व युवा पिढीला आज भारतीय प्राच्यविद्या आणि तत्वज्ञानाची माहिती आहे आणि म्हणूनच एकंधरित या देशाचा विकास रखडलेला आहे. मानव विकासाचे ही तसंच आहे. मनाचं सुख प्राप्त करत आहेत पण बुद्धिच होत नाहीये आणि ज्यांनी बौद्धिक सुख प्राप्त केलय ते आज नक्कीच ज्या त्या क्षेत्रात देशाच नाव मोठ करतायत आणि तेही फक्त भारतीय न्हवे तर विदेशी लोक भारतीय प्रच्याविध्येतुन ऊंच शिखरावर पोहोचलेत. आज जगातल्या प्रत्येक क्षेत्रात श्रीमद् भगवद गीतेचा उपयोग होतोय आणि आपल्या देशात अजुन जाती पातीचे वाद इतिहासांवर टिका होत आहे..जर आपण जागृत झालो नाही तर नक्कीच बाकीचे देश आपल्या प्राच्यविद्येच्या मदतीने आपल्या पुढे जातील याची आपण जाणीव ठेवायला हवी.
आपण सर्व सुशिक्षित आहोत आणि आपल्याला या देशाची सांस्कृतिक निर्मिती करायची आहे.यह देश हमें देता है सब कुछ हम भी तो कोई देना सीखे हा नारा मनात घेऊन युवा पिढीला सर्व समुदाया मध्ये सांस्कृतिक सभ्यता निर्माण करायची आहे आणि तेव्हाच हे राष्ट्रपुनर्निर्माण होईल आणि आपण सर्व एकत्रीत राहणे शक्य होईल. आणि हो थोड़ा संघर्ष सर्वांनी केला तर नक्की आपन एकत्र राहु शकतो कारन हे सिद्ध झालय कि सर्व भाषा ज्या या पृथ्वी वर बोलल्या जातात ते सर्व संस्कृत मधून निर्माण झालेल्यात आणि म्हणून आज सर्व भाषांवर एकता आहे.
आपण जर आपला इतिहास पहिला तर कळेल कि आपला संघर्ष हा जमीन,पाणी, पृथ्वीशी नाहीये.. आपण सर्व एक आहोत पण काही लोकांनी पूर्वी समाजामध्ये विष पेरल्या मुळे आज आपण संगठित नाहीयोत. आपण एकत्र राहू शकतो फक्त आपल्याला ते समाजातील विष काढण्याची गरज आहे. इतिहासात गेलो तर आपल्याला कळेल की माझा देश माझे राष्ट्र हे खरच "सोन्याची चिमणी/ सोनेकी चिड़िया होती. आज वेळ आलिये प्रत्येकाने आपल्या इतिहासाचा अभ्यास करण्याची, राष्ट्राप्रति नात घट्ट करण्याची, देशाला ओळखून घेण्याची आणि जगाला भारताला खरी ओळख करून देण्याची.
समाजामध्ये अशे अनेक So Called महान व्यक्ति आहेत जे आपल्याला चुकीचे ज्ञान देऊन आपल्या मध्ये फुट निर्माण करतायत सोबतच आपल्या संस्कृती पासून आपल्याला लांब नेहण्याचा प्रयत्न करत आहेत. असच एक उदाहरण म्हणजे "मनुस्मृती", मी लहान पनापासून मनुस्मृती बद्दल खुप चुकीचे ऐकत आलोय परंतु जेव्हा ज्ञानमंथन मध्ये अभ्यास झाला तेव्हा कळाले कि अश्या अनेक गोष्टी मनुस्मृती मध्ये आहेत ज्या समाजाला संगठीत करू शकतात. जसे एका नान्याला दोन बाजु असतात तसेच मनुस्मृतीच आहे, विष अमृत दोन्ही आहे जे हवय ते घेण आपल्यावर आहे. हे तरी एक उदाहरण आहे अशे अनेक उदाहरणे आहेत जे आपल्या राष्ट्राला संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण करून देतात पन दुर्भाग्य अस आहे की मुळात आपलाच अभ्यास नसतो त्या गोष्टीचा त्या इतिहासाचा. पण लोक (विदेशी) मात्र त्याचा अभ्यास करून शिखरावर पोहोचलियेत.
इतिहास आणि प्राच्यविध्ये सोबतच जर समाजाला योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते भारतातील संतांनी.आपल्या राष्ट्रच्या निर्मिती माघे अनेक संतांची प्रेरणा होती. संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, रामदास स्वामी,संत रोहिदास व अनेक संतांनी या राष्ट्रमध्ये आपले योगदान अनेक माध्यमातून दिले आहे. संतांनी खऱ्या अर्थाने समाजामध्ये समरसता पासरवन्याचा प्रयत्न केला आणि पसरवली ही, सोबतच रामदास स्वामींनी राजनीती तर संत नामदेवांनी राष्ट्रवाद पेरण्याचे काम केले.एकंधरित पहिल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या पाठीमागे महाराष्ट्रातील संतांची प्रेरणा होती. संतांनी नेहमी समाजाला समरस करण्याचा प्रयत्न केला, जेवढे काही समाज सुधारक आले त्यांच्या सर्वांचे मुळ हे संतांकडूनच आले कारण संतांची शिकवण होती ती म्हणजे "समाजाला कर्त्तव्य शिकवतो तो धर्म आणि हे समाजच आहे जे आपल्याला सर्व काही देत आपण ही काहि तरी द्यायला हवे..आणि जो या समाजाची सेवा करेन त्याला नक्की मोक्ष प्राप्त होइन"
*मित्रांनो आपला इतिहास आपल्याला खुप कही शिकवतो फक्त त्याला जाणन्याची गरज आहे..वेद, उपनिषद, भगवतगीता, पुराण, स्मृती, दर्शन शास्त्र, संत साहित्य, एकात्म मानव जीवन दर्शन व अनेक प्राचीन कला, विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक आपल्याला भरपूर काही शिकवतात पण आपन याला नेहमी टाळतो.एकदा अभ्यास करून पहा जीवनाच कल्याण होईल..*
धन्यवाद
योगेश्वर राजपुरोहित
9404131857